दत्ता मेघे हॉस्पिटलच्या आरोग्य योजनांचा शुभारंभ

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
नागपूर ,
Datta Meghe Hospital सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वानाडोंगरी येथील दत्ता मेघे हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे 'आपला आमदार कौटुंबिक आरोग्यकार्ड' आणि 'दत्तात्रय ज्येष्ठ नागरिक योजना' या आरोग्य योजनांचा शुभारंभ करण्यात आला. या योजनांमुळे नागरिकांना सुलभ, सवलतीच्या दरात आणि अधिक व्यापक आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
 
datta

 
 
योजनांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार समीर मेघे म्हणाले की, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाशी आपुलकीची भावना ठेवून सेवा देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.Datta Meghe Hospital आपल्या वर्तणुकीतून संस्थेविषयी समाजात विश्वास आणि आदर निर्माण होईल, असे कार्य प्रत्येकाने करावे.या कार्यक्रमाला रवी मेघे, राघव मेघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गोतमारे, माजी सभापती उज्ज्वला बोढारे, वानाडोंगरीच्या नगराध्यक्षा सुनंदा बागडे, आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रभारी डॉ. सोनाली वैरागडे, डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर, डॉ. धीरज झाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
सौजन्य:निकिता लुटे, संपर्क मित्र