आणीबाणी लादून संविधान पायदळी तुडविले : डॉ. अवीनाश लोथे

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
मानोरा,
dr avinash lothe इंदिरा गांधी यांनी न्यायालयाचे आदेश व संविधान पायदळी तुडवून आणीबाणी लागू केली होती. १९७५ च्या काळात देशातील राजकीय विरोधकांना मीसा कायद्या अंतर्गत कोणतेही कारण नसतांना अटक करण्यात आली होती, त्यामुळे हा संविधानावर मोठा आघात होता, असे प्रतिपादन डॉ. अविनाल लोथे यांनी केले.
 

emergency 1975, dr avinash lothe, manora, bjp 
स्थानिक विश्रामगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी मानोरा भाजपा मंडळाचे अध्यक्ष अरविंद इंगोले हे होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. लोथे म्हणाले की १९७५ ते ७७ या काळात नागरिकांना अतोनात यातना सहन कराव्या लागल्या. कायद्याला वेशीवर टागुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. याची जाणीव आजच्या पिढीला नाही. आज ८० वर्ष वयाच्या व्यक्तीच सांगु शकतात आणीबाणी म्हणजे काँग्रेस पक्षाचे महापाप होय. इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५dr avinash lothe  रोजी आणीबाणी लागू केली होती. त्या काळात वृत्तपत्र व प्रसिध्दी पत्रकावर बंदी होती. तब्बल १४ लाख राजकीय नेत्यांना व्यापार्‍यांना समाजसेवकांना विद्यार्थ्यांना कोणताही गुन्हा नसताना तुरुंगात डाबंले होते. सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले होते. अत्याचाराविरुद्ध आवाज उठल्यास सरळ तुरंगात टाकल्या जात होते . आणीबाणी ला ५२ वर्षें पुर्ण झाले आहे, आणीबाणी च्या काळ्या दिवसाचे अनेक साक्षीदार नागरीक आजही जिवंत आहे. आणीबाणी चे नाव काढताच त्यांच्या जीवाचा थरकाप फुटतो, असेही ते म्हणाले.
या काळादिवसाच्या प्रसंगी भाजपाचे महादेव ठाकरे, डॉ. सुहास देशमुख, राजू देशमुख, प्रविण घोटे आदी सह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते यावेळी सिमेवर रक्षण करणारे माजी सैनिक शालीकराम सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.