आणीबाणीत मिसाबंदी व सत्याग्रहींवर अनन्वित अत्याचार : वाघमारे

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
पुलगाव,
suresh waghmare आणीबाणीच्या कालखंडामध्ये कोणतेही कारण न देता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. या लोकशाही विरोधी दमनशाहीला विरोध करण्यासाठी देशभर सत्याग्रह झाला. सत्याग्रहींनी देशाचे तुरुंग भरून टाकले. तुरुंगात देशभतांना खुप त्रास सहन करावा लागला, असे प्रतिपादन माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी केले.
 

emergency, misabandi, suresh waghmare, 
भारतीय जनता पार्टी, पुलगाव शहर मंडळाच्या वतीने गांधी चौक येथे विजय निवल यांच्या निवासस्थानी आणीबाणी काळातील लोकशाही सेनानी (मिसा बंदी) सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यकारणी सदस्य व मातृसेवा परिवाराचे संस्थापक अविनाश भोपे उपस्थित होते. व्यासपीठावर शहराध्यक्ष प्रशांत इंगोले होते.
माजी खासदार वाघमारे पुढे म्हणाले, मिसा बंदीत असलेल्यांच्या परिवारातील व्यतीचा मृत्यू झाल्यावर सुद्धा घरी जाता आले नाही. अनेक परिवाराच्या घरी उत्पन्नाचे साधन नव्हते, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था नव्हती. तरी पण लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी कारावास भोगला. भविष्यात कोणताही लाभ मिळावा, म्हणून त्यांनी प्रयत्न केले नाही. अशा तपस्वी लोकांची माहिती आजच्या कार्यकर्त्यांना, पिढीला व्हावी म्हणून लोकतंत्र सेनानी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याचे ते म्हणाले. अविनाश भोपे यांनी लोकतंत्र सेनानीच्या कार्याचे चिंतन करून संघटनेसाठी समर्पित कार्यकर्ते निर्माण करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणारे लोकतंत्र सेनानी विजय फलके, अनंत लोणकर, राजाभाऊ सावरकर, अरुण डरंगे, सुरेश गणेशपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशांत इंगोले यांनी suresh waghmare  प्रास्ताविक केले. संचालन महामंत्री ज्ञानेश्वर कुंभार यांनी केले तर आभार सागर पेरके यांनी मानले. कार्यक्रमाला माजी तालुका संघचालक विजय निवल प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, भाजपाच्या निर्वाचित नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक हजर नसल्याने आश्चर्य व्यत करण्यात आले.