मुंबई
gaurav khanna divorce टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपं गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘बिग बॉस 19’ आणि ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया 1’चा विजेता गौरव खन्ना यांच्या पत्नी आकांक्षा चमोला यांनी ‘लॉक अप 2’ या शोमध्ये त्यांच्या घटस्फोटाबाबत मोठा खुलासा केला आहे. गेल्या वर्षभरापासून दोघं वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं तिने सांगितल्याने चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
लग्नाच्या दहा वर्षांनंतर सर्वकाही सुरळीत दिसत असताना या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय का घेतला, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. या खुलाशानंतर गौरव खन्ना यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस 19’च्या घरात असताना सहस्पर्धक मृदुल तिवारी यांच्यासोबत त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली होती.या व्हिडिओमध्ये गौरव खन्ना म्हणताना दिसतात की, त्यांच्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली असून अद्याप त्यांना मूल नाही, कारण ते त्यांच्या पत्नीच्या इच्छेचा आदर करतात. एकेकाळी त्यांना मुलं हवी होती, मात्र आकांक्षा त्यासाठी तयार नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले होते. पुढे ते म्हणतात की, आता प्रेम केलंय तर ते निभवावं लागतं आणि मूल ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे. ते दिवसभर शूटिंगमध्ये व्यस्त असतात आणि आकांक्षानेही काम सुरू केल्यास मुलाची देखभाल कोण करणार, तसेच ही जबाबदारी बाहेरच्या व्यक्तीवर सोपवणे त्यांना योग्य वाटत नाही, असे त्यांनी त्या संभाषणात सांगितले होते.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या फॅमिली gaurav khanna divorce वीकदरम्यान आकांक्षा चमोला घरात आल्या असताना त्यांनी मालती चाहर आणि प्रणीत मोरे यांच्यासमोर फॅमिली प्लॅनिंगबाबत आपला दृष्टिकोन मांडला होता. त्या म्हणाल्या होत्या की, त्यांनी कोणतीही ठोस प्लॅनिंग केलेली नाही, मात्र आतापर्यंत त्यांना तशी इच्छा झालेली नाही. भविष्यातही ही गोष्ट कठीण वाटत असल्याचे सांगत त्यांनी मातृत्वाबाबतची स्वतःची अनिच्छा स्पष्ट केली होती. स्वतःमध्ये ती भावना नसल्याचे त्यांनी नमूद केले होते आणि लोकांनी त्यांना स्वार्थी म्हणाले तरी तो त्यांचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी म्हटले होते.याच चर्चेदरम्यान मालती चाहर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आकांक्षाने सांगितले होते की, त्यांना भीती वाटत नाही, पण इतकी मोठी जबाबदारी आपण पेलू शकू असे वाटत नाही. बाळ जन्माला घालणे हे अतिशय जबाबदारीचे काम असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर 100 टक्के योगदान द्यावे लागते, असेही स्पष्ट केले होते.या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिक उधाण आले असून चाहत्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.