केतन अग्रवाल हत्येपूर्वी ‘रंगीत तालीम’

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
पुणे
ketan agarwal murder case पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा राज्यभर खळबळ उडवली आहे. केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी अत्यंत थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केतनची निर्घृण हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या संपूर्ण कटामागे दीर्घ नियोजन असल्याचा दावा पोलिसांनी केला असून, आरोपींनी हत्या करण्यापूर्वी सविस्तर तयारी केल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे.
 

ketan agarwal murder case 
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्या करण्याच्या विविध पद्धतींबाबत इंटरनेटवर, विशेषतः गुगलवर शोध घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. केतनला विष देऊन किंवा किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या कशी करता येईल, यासंदर्भातील माहिती त्यांनी ऑनलाइन शोधल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याच अनुषंगाने लोहगड किल्ल्यावर अशी ठिकाणेही त्यांनी शोधली, जिथून एखाद्याला ढकलल्यास ते अपघातासारखे भासेल आणि संशय टाळता येईल. तपासात असेही समोर आले आहे की, घटनेपूर्वी आरोपींनी संपूर्ण कटाची सविस्तर आखणी केली होती. सिया खाली बसल्यानंतर चेतनने केतनला धक्का द्यायचा, असा ठोस प्लॅन ठरवण्यात आल्याचेही उघड झाले आहे.या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हत्येपूर्वी आरोपींनी ‘रंगीत तालीम’ केल्याचा पोलिसांचा दावा. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन हत्येची प्रत्यक्ष सराव स्वरूपात तयारी केल्याचे तपासातून समोर आले आहे. १४ जून रोजी केतनच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे, तर हत्येनंतर पोलिस चौकशीदरम्यान कोणती उत्तरे द्यायची याचाही आधीच सराव करण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. संशय टाळण्यासाठी वेषांतराची योजना आखण्यात आली होती, तसेच घटनेनंतरचे चॅट आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
 
 
दरम्यान, आज लोहगड ketan agarwal murder case  किल्ल्यावर पहाटेपासून फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत सीन रिक्रिएशन करण्यात येत आहे. यावेळी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनाही घटनास्थळी नेण्यात आले आहे. घटनास्थळावरून रक्त, त्वचा आणि इतर जैविक नमुने संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असून, केतन अग्रवालचा खून नेमका कसा करण्यात आला याची प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. ज्या ठिकाणावरून केतनला दरीत ढकलल्याचा संशय आहे, त्या भागाचीही कसून तपासणी करण्यात येत आहे.घटनास्थळावरील प्रत्येक तपशील बारकाईने तपासला जात असून, संकलित पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे ग्रामीण पोलीस डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.