मुंबई
maharashtra monsoon राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 48 ते 72 तास राज्यातील विविध भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता असून, ज्या भागांत मुसळधार पावसास सुरुवात होईल तेथील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, पुणे शहरात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शिवाजीनगर, स्वारगेट, डेक्कन, कोथरूड, पर्वती, सहकारनगर, कात्रज, येरवडा, कल्याणीनगर, औंध तसेच सिंहगड रस्ता परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली. विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यांसह वादळ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाड्यासाठीदेखील यलो अलर्ट जारी करण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस सक्रिय झालेला पाऊस पुन्हा दोन दिवसांपासून गायब झाला असून सध्या ऊन पडत आहे. असे असले तरी, भाताच्या रोपांची लागवड योग्य वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. भाताची रोपे 21 दिवसांच्या आत लावणे आवश्यक असल्याने विलंब झाल्यास उत्पादनात घट होण्याची भीती आहे. पुरेसा पाऊस नसतानाही नदीचे पाणी उपसा करून शेतकरी भात लागवडीचे काम करत आहेत. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रात येत्या काळात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात रविवारपासून (28 जून) पावसाचे maharashtra monsoon पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी रविवारी पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पावसाने विश्रांती घेतली, तसेच तापमानातही काहीशी वाढ नोंदविण्यात आली. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.