आजनसर्‍यातून पंढरीसाठी बससेवा

वारकर्‍यांसाठी आनंदाची बातमी

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
आजनसरा,
msrtc विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागलेल्या लाखो भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे हिंगणघाट आगार व्यवस्थापक गौतम शेंडे, बसस्थानक प्रमुख जयंत शेडमाके यांनी मायेची साद घातली आहे. पंढरीच्या दिशेने जाणार्‍या वारकर्‍यांची वाट सुकर व्हावी, यासाठी हिंगणघाट आगारातर्फे संत भोजाजी ते विठू माऊली पंढरपूर थेट बससेवा बुधवार १ जुलैपासून सुरू होणार आहे.
 

msrtc, pandharpur, warkari, 
दरवर्षी पावसात भिजत, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत पंढरीच्या दिशेने पाऊल टाकणार्‍या भतांचा ओघ थांबत नाही. यंदा मात्र हा प्रवास अधिक सुखाचा होणार आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी आसुसलेल्या भाविकांसाठी भोजाजी महाराज देवस्थान, आजनसरा येथून आरक्षण सुरू होत आहे. प्रत्येक भताला आता थेट पंढरीत पोहोचता येणार आहे. हिंगणघाट आगाराचे व्यवस्थापक व कर्मचारी वर्गाने ही सेवा msrtc  म्हणजे विठू माऊलीचीच कृपा असल्याची भावना व्यत केली. ज्या भतांना पंढरपूर बस प्रवास करायचा आहे त्यांनी संजयकुमार कोसुरकर, प्रशांत अरतपायरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हिंगणघाट आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.