पांढराबोडी तलाव संवर्धनासाठी नागरिकांचा पुढाकार

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur Ploggersपश्चिम नागपुरातील ऐतिहासिक पांढराबोडी तलावाच्या संवर्धनासाठी नागपूर प्लॉगर्सच्या पुढाकाराने रविवारी 'मिशन सेव पांढराबोडी लेक' अभियानाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात १०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत तलाव परिसरातून सुमारे ५०० किलो कचरा हटवून श्रमदान केले.
 
pani
 
 
स्वच्छता मोहिमेत नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह रेड स्वास्तिक सोसायटी, ईशा फाउंडेशन, एग्रोवेट संस्था, इको फ्रेंडली संस्था,Nagpur Ploggers एनाकॉन लॅबोरेटरीज, बाजीप्रभू नगर व संजय नगर रहिवासी, विजयीनी सखी मंच आदी संस्थांनी सहभाग नोंदविला.पांढराबोडी तलावाचे पुनरुज्जीवन आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रत्येक रविवारी सकाळी ७ वाजता स्वच्छता व श्रमदान अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र