प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब

पोलिओमुक्त भारतासाठी सामूहिक संकल्प

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
pulse polio देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी राबविण्यात येणार्‍या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज, २८ जून रोजी येथील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांवर लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
 

pulse polio, polio campaign, child vaccination, mangrulnath, health news, immunization, maharashtra health, polio free india, rural health, government campaign, vaccination drive 
यावेळी आमदार श्याम खोडे, जिल्हा शल्यचिकित्सक अनिल कावरखे, नगरसेवक नंदलाल पवार, उपाध्यक्ष अनिल गावंडे, शिक्षण सभापती विरेंद्रसिंह ठाकूर यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. त्यांनी पोलिओ सेंटरवर जाऊन बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना आमदार श्याम खोडे यांनी प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब मिळणे अत्यंत आवश्यक असून, निरोगी व पोलिओमुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला पोलिओचे डोस देणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात आली. जन्मापासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. आरोग्य विभागाने दुर्गम व वस्ती भागात जाऊनही बालकांपर्यंत ही सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
पोलिओसारख्या गंभीर आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हा एकमेव सुरक्षित उपाय असल्याने प्रत्येक पालकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक यांचे संयुक्त प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.