वीटभट्ट्या, वस्त्यांतही पोहोचली आरोग्यची चमू

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
वर्धा,
vaccination drive राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत आज रविवार २८ रोजी आरोग्य विभागाने जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून ५ वर्षा खालील बालकांना पोलिओचा डोस पाजला. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाच्या चमू दुर्गम भागांपर्यंतही पोहोचल्या. वीटभट्ट्या व मजुरांच्या वस्तीत जात तेथील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजली.
 

pulse polio, wardha, vaccination drive, health news, polio campaign, migrant health, brick kiln workers, maharashtra health, child immunization, rural health, government scheme 
नाचणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गुंजखेडा आरोग्य उपकेंद्राच्या मोबाईल आरोग्य पथकाने गावापासून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या वीटभट्ट्या आणि मजूर वस्त्यांमध्ये जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब दिले. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा साखरकर, डॉ. अंजली जाधव, आरोग्य सहाय्यक दिलीप उटाणे, सामुदायिक आरोग्य अधिकारी प्राचू अवथरे, आरोग्य सेवक नेहाल इंगोले, पंकज मेश्राम यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जिल्ह्यात ही मोहीम जिल्हाधिकारी वान्मथी सी., जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी पराग सोमण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात एका छोट्या मुलास पोलिओची लस पाजून या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी स्वप्निल बेले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर आदींची उपस्थिती होती.
देवळी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत आज ग्रामीण रुग्णालय, देवळी येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी आ. राजेश बकाने यांनी बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ केला. आपल्या मुलांच्या निरोगी व सुरक्षित भविष्यासाठी हे लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. यावेळी त्यांनी दोन थेंब जीवनाचे... पोलिओमुत भारताचे! हा संदेश देत सर्व पालकांना आपल्या परिसरातील लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्येक बालकाचे लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले.