मुंबई
notice rbi मोठी घडामोड समोर आली असून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहकार कायद्याच्या कलम 35A आणि 47A अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बँकेकडून चुकीच्या पद्धतीने संचालकांना देण्यात आलेले कर्ज, कर्जमाफी तसेच विविध गैरकारभाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर RBIकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घडामोडीनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी बँकेच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तातडीने प्रशासक नेमला पाहिजे, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या सुरू असलेली नोकरभरतीही बोगस पद्धतीने होत असल्याचा दावा त्यांनी केला असून, RBIची नोटीस आणि नोकरभरतीचा प्रकार मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच याचे परिणाम दिसतील, असेही त्यांनी नमूद केले.या पार्श्वभूमीवर बँकेच्या notice rbi संचालक मंडळाची चिंता वाढल्याची चर्चा सुरू आहे. बँकेकडून झालेल्या कथित चुकीच्या कर्जवाटप, कर्जमाफी आणि गैरव्यवहारांमुळे RBIने ही नोटीस बजावल्याचे बोलले जात असून, या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या नोटीसीवरूनच पडळकर यांनी संचालक मंडळावर टीकास्त्र सोडले असून बँकेतील परिस्थिती गंभीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.