रोहित शेट्टीला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

20 कोटींच्या खंडणीसाठी स्टाफला ऑडिओ कॉल

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
मुंबई
rohit shetty death threat बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या स्टाफशी ऑडिओ कॉलद्वारे संपर्क साधत तब्बल 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. मागणी केलेली रक्कम न दिल्यास यावेळी थेट रोहित शेट्टी यांनाच लक्ष्य केले जाईल, अशी गंभीर धमकी या कॉलमध्ये देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
 

rohit shetty death threat 
ही घटना काही महिन्यांपूर्वी रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर घडल्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी रोहित शेट्टी यांच्या स्टाफला सुमारे 90 सेकंदांची एक ऑडिओ क्लिप प्राप्त झाली. या क्लिपमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा निकटवर्तीय सहकारी शुभम लोणकर याचा आवाज असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शुभम लोणकर हा 2024 मध्ये घडलेल्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात तसेच फेब्रुवारी 2026 मध्ये रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातही फरार आरोपी असल्याचे सांगितले जात आहे.धमकीची ही ऑडिओ क्लिप रोहित शेट्टी यांच्या स्टाफकडून तात्काळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली असून जुहू पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा आवाज शुभम लोणकर याचाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी त्याची खात्री करण्यासाठी ही क्लिप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. अज्ञात कॉल करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचने विशेष तपास पथक कार्यरत केले असून तांत्रिक तपासही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
 
यापूर्वी 31 जानेवारी रोजी rohit shetty death threat  उशिरा रात्री जुहूतील महमूद चौक परिसरात रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात दीपक शर्मा नावाच्या आरोपीने दुचाकीवरून येत गोळीबार केल्याचे समोर आले होते आणि नंतर त्याला आग्रा येथून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान दीपकने सोशल मीडियावर लॉरेन्स टोळीशी संबंधित पोस्ट पाहिल्यानंतर तो या टोळीच्या संपर्कात आल्याची कबुली दिल्याचेही उघड झाले होते.
 
दरम्यान, या घटनेशी संबंधित rohit shetty death threat  पार्श्वभूमी लक्षात घेता मुंबई पोलिसांची तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.या घडामोडींसोबतच अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचे ट्वीट, राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमल्याची चर्चा, शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद, तसेच ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच घडलेल्या प्रकारासह महाराष्ट्रातील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडीही चर्चेत आहेत.