मालेगाव
palkhi sohala श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराज पायंदळ पालखीचे आज, २८ जून रोजी मालेगाव शहरात आगमन झाले. गण गण गणात बोते च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने संपूर्ण मालेगाव नगरी भक्तीसागरात नाहून निघाली होती. पालखीच्या आगमनामुळे शहराला एका भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून, हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले. पालखीच्या आगमनाने शहरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले होते विविध ठिकाणावरून हजारो भावी भक्त पालखीच्या दर्शनासाठी शहरात दाखल झाले होते
श्री क्षेत्र डव्हा येथून मार्गस्थ झालेली पालखी सकाळी ८ वाजता मालेगाव शहरात दाखल झाली. पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात ठिकठिकाणी भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखी मार्गावर महिलांनी आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीसोबत ७०० वारकरी हातात भगवे ध्वज आणि पताका घेऊन शिस्तीत चालत होते. संत परंपरा, भक्ती, शिस्त आणि वारकरी टाळ मृदंगातसंस्कृतीचे हे अनुपम दर्शन डोळ्यांत साठवण्यासाठी मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य भाविक शहरात दाखल झाले होते.
पालखी सोहळा पंचायत समिती परिसरात आला असता, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पालखीचे मनोभावे पूजन व स्वागत केले. मनोभावे दर्शन घेतलेयामध्ये शहरासह पंचक्रोशितील भाविकासह शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचायत समितीमधील पूजनानंतर palkhi sohala पालखीची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नगरपंचायत कार्यालय, समोरिल मार्गावरून शिव चौक, गांधी चौक आणि जुन्या बस स्टँड मार्गानी जात पालखी ’माहेश्वरी भवन’ येथे विसावली. या मुख्य मार्गांवर पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. पालखी मार्गावर अनेक भाविकातर्फे पिण्याचे पाणी चहा तसेच इतर साहित्याचे वाटप वारकरी मंडळींना करण्यात आले. माहेश्वरी भवन येथे पालखीतील सर्व वारकर्यांसाठी भोजनाची (महाप्रसादाची) उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.दुपारच्या भोजनानंतर आणि विश्रांतीनंतर, ’शेगावीच्या राणा’ची ही शिस्तबद्ध पायंदळ पालखी पुढील प्रवासासाठी म्हणजेच शिरपूरकडे अत्यंत उत्साहात प्रस्थान झाली. पालखीच्या या आगमनाने मालेगावात संपूर्ण दिवसभर पवित्र आणि धार्मिक भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.