अख्तरच्या हॅट् ट्रिकमुळे पोरवाल विजयी

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
- सरदार अटलबहादूर स्मृती फुटबॉल स्पर्धा

नागपूर, 
sardar atalbahadur smruti football Spardha सरदार अटलबहादूर स्मृती फुटबॉल स्पर्धेत अर्सलन अख्तरच्या हॅटट्रिकने पोरवाल फुटबॉल अकादमीने विजय प्राप्त केला. एनडीएफएच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या स्पर्धेत काल पोरवाल व नोबल स्पोर्ट्स अकादमी यांच्यात चुरशीचा सामना झाला. अर्सलन अख्तरने ३८, ४२ व ५१ व्या मिनिटाला तीन गोल केले. त्यामुळे पोरवालचे पारडे जड झाले होते.
 
 
parwal
 
वंश पौनीकरने अजून १ गोल करून संघाला मजबूत केले. नोबल अकादमीतर्फे एकही गोल होऊ शकला नाही. अख्तरला सामनावीर घोषित करण्यात आले. रेल्वे अधिकारी दिलीपसिंग यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी आसिफ शेख, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष हरीश वोरा, सचिव स्टॅनली ग्रेगरी, हेमंत साहनी, राजेश राऊत, अंकुश भडांगे, पप्पन प्रामाणिक उपस्थित होते.