सेलू,
solar power सोलरचा योग्य वापर करून वीज देयक कमी नव्हे शून्य येते या आशेने येथील वीज ग्राहकाने घरच्या छतावर सोलर लावले. देयक कमी येण्या ऐवजी कधी नव्हे एवढे चक्क १६ हजार आले. ते देयक पाहून वीज ग्राहकाला भोवळ येणे तेवढेच बाकी होते. येथील अनिल काटोले यांनी मार्च महिन्यात ३ किलो व्हॅटचे सोलर घेतले. त्यावेळी आधी असलेले मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसविले अन् फटका बसला. जून महिन्यात आलेले देयक तब्बल १६ हजार रुपयाचे आले.
मार्च महिन्यात सोलर लावल्या नंतर मार्च एप्रिल महिन्याचे पहिले देयक ६३० रुपये तर एप्रिल-मेचे देयक ३९० रुपये आल्यानंतर मे व जूनचे देयक तब्बल १६ हजार रुपयाचे आल्याने वीज ग्राहकाला धक्काच बसला.
विजेचा वापर किती केला या पेक्षा त्यांचे घरी असलेल्या विद्युत साधनाचा विचार केला तरी सोलर असताना १६ हजाराचे वीज देयक आले कसा असा प्रश्न काटोले पडला आहे.अनिल काटोले यांनी सोलर व वीज वितरण यांना याची कल्पना दिली असून वीज ग्राहकाला न्याय मिळेल का या कडे लक्ष लागले आहे.