टेबल-टेनिस स्पर्धेत ठाण्याच्या काव्याला दुहेरी विजेतेपद

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
- महाराष्ट्र राज्य रँकिंग स्पर्धा
 
नागपूर, 
table tennis tournament ठाण्याच्या काव्या भटने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुभेदार सभागृहामध्ये आयोजित राज्यस्तरीय रँकिंग टेबल-टेनिस स्पर्धेत दुहेरी विजेतेपद पटकाविले. पुरुष एकेरीचे विजेतेपद मुंबईच्या जश मोदीने मिळवले, तर ठाण्याचा प्रतीक तुलसानी १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरी स्पर्धेत विजेता ठरला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात, तिसऱ्या मानांकित काव्याने मुंबईच्या अव्वल मानांकित अनन्या चांदेला पाच डावांमध्ये हरवून मोठा उलटफेर केला.
 

table tennis 
 
उपांत्य फेरीत ठाण्याच्या पाचव्या मानांकित श्रुती अमृतेला पराभवाचा सामना करावा लागला, तर काव्याने दुसऱ्या मानांकित संपदा भिवंडकरला पराभूत केले. १९ वर्षांखालील मुलींच्या विजेतेपदाच्या लढतीत, काव्याने साजेसा खेळ करत दुसऱ्या मानांकित स्वरा करमरकर (एनएसएच) हिला पराभूत केले. एसएमआयएसमध्ये काव्याने चौथ्या मानांकित रुचिरा दरवटकर (पुणे) हिला पराभूत केले, तर स्वराने नागपूरच्या ११व्या मानांकित जेनिफरला पराभूत केले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात, अव्वल मानांकित जशने ११ व्या मानांकित पुणेकर ईशान खांडेकरवर ११-९, ११-६, ११-५, ११-७, ११-५ असा विजय मिळवला. जशने चौथ्या मानांकित अनिश सोनटक्के (कोलकाता) याचा सात चिवट गेममध्ये ६-११, ११-१३, १३-११, ११-५, ११-७, ९-११, ११-५ असा पराभव केला, तर ईशानने मानांकित सागर कस्तुरे (मुंबई) याला सहा रोमांचक गेममध्ये ११-७, ११-६, ९-११, ५-११, ११-५, ११-४ असे पराभूत करीत धक्का दिला.
 
 
प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती अनिल एस. किलोर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी एमएसटीटीएचे सचिव ॲड. आशुतोष पोतनीस, डॉ. शरद सूर्यवंशी, एनडीटीटीएचे उपाध्यक्ष शेखर टोंगो, एनडीटीटीएचे सचिव ॲड. अखिलेश पोतनीस, दीपक धोते, दीपक कानेटकर आणि संजय पोतनीस उपस्थित होते.