नवी दिल्ली
upsc recruitment 2026 केंद्र सरकारमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात UPSC ने भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी अंतर्गत तब्बल 105 पदांसाठी थेट भरती जाहीर केली आहे.
या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया आज, 27 जून 2026 पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत ऑनलाइन रिक्रूटमेंट अॅप्लिकेशन पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची ही मोठी संधी असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीद्वारे उमेदवारांना भारतupsc recruitment 2026 सरकारच्या विविध महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये सेवा देण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, संरक्षण मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांचा समावेश आहे. या सर्व मंत्रालयांमधील रिक्त पदे या भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत.या भरतीअंतर्गत विविध प्रकारची पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये जॉइंट डायरेक्टर, एरोनॉटिकल ऑफिसर, लीगल ऑफिसर, कंपनी प्रॉसिक्युटर, डेप्युटी सुपरिंटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट, सिव्हिलियन असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, स्टोअर ऑफिसर आणि सीनियर फोटोग्राफिक ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी मेडिकल ऑफिसर आणि रिसर्च ऑफिसर (सिद्धा) ही पदेही उपलब्ध आहेत. याशिवाय ऑर्थोपेडिक्स, कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी यांसारख्या विविध शाखांमध्ये स्पेशालिस्ट ग्रेड III पदांसाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत ओआरए पोर्टलवर म्हणजेच upsconline.nic.in वर भेट देणे आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूकपणे भरावी लागेल. आवश्यक कागदपत्रे दिलेल्या स्वरूपात अपलोड करून, ज्या पदांसाठी शुल्क लागू आहे ते ऑनलाईन भरावे लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवणे आवश्यक आहे.दरम्यान, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक असल्याचे यूपीएससीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी यांची पूर्ण माहिती मिळून अर्ज करताना कोणतीही चूक टाळता येईल.