उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक

एक ठार, दोघे जखमी

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
वर्धा,
accident रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू तर दोन जखमी झाले. हा अपघात नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जाम शिवारात मध्यरात्री १.२० वाजताच्या सुमारास झाला. जखमींना महामार्ग पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.
 

wardha, accident, truck collision 
मिळालेल्या माहितीनुसार, आर. जे. ११ जी. बी. १६७१ क्रमांकाच्या ट्रक चालक मुकेश बघेल (४१) रा. राजस्थान व लिनर सोनू शर्मा (२८) यांनी टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून दोघेही कॅबीनमध्ये बसून होते. दरम्यान, एम. एच. ४९ बी. झेड. ३६७२ क्रमांकाचा ट्रक चालक राजू पटेल (४४) रा. मध्यप्रदेश याच्या ट्रकची उभ्या ट्रकला जबर धडक झाली. यात राजू पटेल याचा जागीच मृत्यू झाला तर उभ्या ट्रकमधील दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.