पावसाने डोळे वटारले तरीही पेरणीचा धडाका

जिल्ह्यात सरासरी केवळ ९८.३ मि.मी. पाऊस...३५ हजार हेक्टरवर खरीप पेरणी

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
वाशीम,
monsoon जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. तोही हलक्या स्वरूपात. पर्जन्यमानाच्या अहवालानुसार अद्यापही जिल्ह्यातील अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस पडलाच नाही. असे असतानाही शेतकर्‍यांनी पेरणीचा धडाका सुरू केला असून, जिल्ह्यात जवळपास ३५ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
 

monsoon  
यावर्षी मान्सूनला अपेक्षेपेक्षा जास्त विलंब झाला. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहू लागले होते. अशाच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात जुन महिन्यात २५ तारखेपर्यंत एकूण सरासरी १३८.७ मि.मी. पाऊस अपेक्षीत असतो. प्रत्यक्ष २८ जुनपर्यंत एकूण सरासरी ९८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. हे प्रमाण जुनमधील एकूण अपेक्षीत सरासरीच्या ४२.२ टक्के आहे. monsoon  काही मंडळात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी बहुतांश मंडळात अद्यापही पेरणी योग्य पाऊस पडलेला नाही. किमान ७५ मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करणे योग्य ठरते. मात्र, पावसाने हजेरी लावताच शेतकर्‍यांनी पेरणीचा धडाका सुरू केला असून, जिल्ह्यात जवळपास ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. अशात पावसाने खंड दिल्यास शेतकर्‍यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
२८ जुनपर्यंतचा तालुकानिहाय पाऊस
 
 
वाशीम - ९४.१ मिमी
रिसोड - १०६.७ मिमी
मालेगाव - १०५.९ मिमी
मंगरुळनाथ - ९३.६ मिमी
मानोरा - ९०.८ मिमी
कारंजा लाड - ९६.१ मिमी
छायाचित्र - शेतामध्ये पेरणी करताना शेतकरी