नागपूर,
All India Gandharva Mahavidyalaya अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत परीक्षेत सौमित्र श्रीरंग बोरीकर याने उल्लेखनीय यश संपादन केले. त्याने 'मध्यमा पूर्ण' ही परीक्षा 'विशेष योग्यता' श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला.
या यशासाठी त्याला 'गुरुप्रसाद संगीत विद्यालय'च्यामनीषा कुलकर्णी यांचे तसेच ज्येष्ठ संगीततज्ज्ञ विजय बोरीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सौमित्रच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही त्याने संगीत क्षेत्रात अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, All India Gandharva Mahavidyalaya अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
सौजन्य: विजय बोरीकर,संपर्क मित्र