गडचिरोली,
ashish-pipre-arrested : जिल्हाधिकार्यांची बनावट लेटरहेडवर हुबेहूब स्वाक्षरी करून तब्बल चार कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी बनावट प्रशासकीय मान्यता (प्रमा) आदेश तयार केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करत प्रमुख संशियत आशिष पिपरे याला रविवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या तपासानंतर झालेल्या या कारवाइमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेला आशिष पिपरे हा चामोर्शी नगरपंचायतीतील स्विकृत नगरसेवक असून त्याची पत्नीही नगरसेविका आहे. विशेष म्हणजे पिपरेची तीन मिहन्यापूर्वी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती, असे जिल्हाध्यक्षांचे म्हणणे आहे. भाजपमध्ये असताना त्याने काँग्रेसच्या गटातून स्वीकृत नगरसेवक पद मिळविले होते. त्यापूर्वी अगरबत्ती प्रकल्पाच्ङ्मा नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक केल्याचा आरोपही चामोर्शीतील काही महिलांनी त्यांच्यावर केले होते.
मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता
विशेष म्हणजे, यापूर्वी अशाच पद्धतीने काही विकासकामांसाठी बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून त्याचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या सर्व व्यवहाराची चौकशी पोलिसांकडून सुरु असून, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका बनावट ‘प्र’ा’ पुरते मयार्दित नसून, त्यामागे मोठे रॅकेट कार्यरत होते का, याचाही कसून तपास सुरु आहे.
...अजून मासे गळाला लागण्याची शक्यता
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यत अनेक महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोदंविले आहेत. मोबाईल काल्स डिटेल्स, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे तसेच बनावट कागदपत्रांच्या निमितीमागील संपूर्ण साखळीचा बारकाईने मागोवा घेतला जात आहे. पिपरेकडून होणार्या चौकशीतून यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तीचीही नावे पूढे येण्याची शक्यता असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.