नागपूर विभागीय तैलिक महासभेच्या अध्यक्षपदी अश्विन साहू

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
ashwin-sahu : छत्रपती संभाजीनगर येथे माजी खासदार रामदास तडस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अश्विन साहू यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नागपूर विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यावर वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या सहा जिल्ह्यांमध्ये संघटन मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साहू यांची ही नियुक्ती त्यांच्या समाजसेवेतील योगदान, प्रभावी नेतृत्व आणि निस्वार्थ कार्याची दखल म्हणून करण्यात आल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाखाली तैलिक समाज अधिक संघटित, सक्षम आणि प्रगतिशील होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
 
 

j