बुलढाणा,
buldhana-thunderstorm-lightning-rain : गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा शहरासह परिसरातील गावात विजांच्या प्रचंड कडकडाटात कोसळधार पावसाने हजेरी लावली. विजांची थरथराट अनेकांनी अनुभवला काही भागातील शेतकर्यांनी गेल्या दोन तिन दिवसात पेरणी आटोपली असली तरी सुद्धा बरेच शेतकर्यांची पेरणी झाली नाही. या पावसाने नदी, ओढे, नाले तुडूंब भरून वाहले त्यामुळे पाणी टंचाईची समस्या काही महिने दुर झाली आहे.