धनादेश अनादरप्रकरणी एक वर्षाचा कारावास

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट,
cheque-dishonour-case : धनादेश अनादर प्रकरणी येथील २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरीष्ठ स्तर तथा मुख्य न्याय दंडाधिकारी सय्यद यांनी आरोपी राहुल भांडे रा. हिंगणघाट याला १ वर्ष साधा कारावास आणि १ लाख ५० हजारांचा दंड ठोठावला.
 
 

hj 
 
 
 
आरोपी राहुल भांडे याने श्री गुरुदेव दत्त नागरी सहकारी पतसंस्था, हिंगणघाट यांच्याकडून घेतलेल्या कर्जाचे नियमित हप्ते भरले नव्हते. थकीत झालेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी त्याने फिर्यादी पतसंस्थेला धनादेश दिला होता. परंतु, तो धनादेश वटला नव्हता. धनादेशाच्या त्या रकमेच्या मागणीचा फिर्यादीचा नोटीस आरोपीला मिळूनही त्याने फिर्यादीला धनादेशाची रक्कम दिली नाही. फिर्यादीने २०२४ मध्ये त्याचेविरुद्ध फौजदारी न्यायालयात धनादेश अनादराचे प्रकरण दाखल केले होते.
 
त्या प्रकरणात फिर्यादीतर्फे अध्यक्ष संजय तराळे यांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीला बचावाची संधी दिल्यानंतर न्यायाधीश सैय्यद यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकूण दोषी ठरवून शिक्षा सुनावली. पतसंस्थेच्या वतीने ॲड.. एस. एन. ढगे व ॲड. आर. एस. ढगे, यांनी काम पाहिले.