देवळी खरेदी-विक्री समितीवर शेतकरी सहकारी पॅनलचे वर्चस्व

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
देवळी,
deoli-purchase-and-sale-committee : देवळी तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलने एकहाती विजय मिळवत ११ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळविला. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलचा पराभव केला.
 
 

j 
 
 
 
या निवडणुकीत ७०१ मतदारांपैकी ५७१ मतदार मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी ५२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती देवळी येथे घेण्यात आली. मतदान शांततेत पार पडले. उशिरा रात्री मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर होताच विजयी समर्थकांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
 
निवडणुकीपूर्वी १५ पैकी ४ संचालक सेवा सहकारी गटात बिनविरोध निवडून आले होते. त्यात अमोल कसणारे, मयूर डफळे, नीता वसू, रोशन थूल हे बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर उर्वरित ११ जागांसाठी रविवारी मतदान झाले. या सर्व ११ जागांवर विजय मिळवला.
 
 
विजयी उमेदवारांमध्ये वैयक्तिक मतदार संघातून शरद आदमने, मंगेश गावंडे, सुनील चोरे, गणेश पाचडे, किरण राऊत, तृषारकांत राऊत इतर मागासवर्गीयातून पुंडलिक लाकडे, अनु. जाती-जमाती बाबाराव थूल, विमुक्त भटक्या जाती सुरेश उपासे, महिला राखीवमधून कमल डफरे, माधुरी राऊत यांचा समावेश आहे.