पुरस्कारप्राप्त ‘अपहरण’ आता इंग्रजीत

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Dr. Ashok Kale ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक काळे यांच्या गाजलेल्या ‘अपहरण’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे. या कादंबरीचा अनुवाद एस.बी. सिटी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रा. प्रांजली काणे यांनी केला आहे.

126 
 
 
'अपहरण' या कादंबरीला बाबुराव बागुल, शांताबाई शेळके, मुकुंदराव पाटील, वामनराव गद्दामवार आणि अक्षरवेध यांसह एकूण आठ प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.Dr. Ashok Kaleडॉ. अशोक काळे यांचे तीन काव्यसंग्रह, एक ललित लेखसंग्रह तसेच ‘रेखाटन रंगरेषा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. साहित्य क्षेत्राबरोबरच त्यांनी संगीत आणि शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. इंग्रजी अनुवादामुळे त्यांच्या साहित्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक वाचकवर्ग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सौजन्य:संजीव भुसारी,संपर्क मित्र