काम करण्यास नकार तर थेट हत्या

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
बीड
golden triangle म्यानमार, थायलंड आणि लाओस यांच्या सीमाभागातील ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरात उघड झालेल्या धक्कादायक प्रकाराने देशभरात खळबळ उडाली आहे. या भागात भारतातील तब्बल 800 तरुण अडकल्याची माहिती समोर येत असून, महाराष्ट्रातील 25 जण या प्रकरणात ओलिस ठेवण्यात आल्याचे समजते. या गंभीर घटनेमुळे संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
 

golden triangle 
या भागात बेकायदेशीररीत्या ऑनलाइन फसवणुकीची कामे करून घेतली जात असल्याचा आरोप समोर आला आहे. काम करण्यास नकार दिल्यास थेट हत्या केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा बीड येथील एका तरुणाने आपल्या मित्राशी फोनवर बोलताना केल्याचे सांगितले जात आहे. या खुलाशानंतर परिसरात आणि संबंधित कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
बीडमधील एक तरुण 4 जूनपासून याच भागात अडकल्याची माहिती आहे. अॅनिमेशन डिझाइन क्षेत्रात काम करणारा हा तरुण ऑनलाइन नोकरी शोधत होता. याच दरम्यान व्हॉट्सअॅपवर मिळालेल्या जाहिरातीच्या माध्यमातून त्याला म्यानमारला नेण्यात आले. त्याने बीडमधील आपल्या मित्राशी संपर्क साधत संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील अनेक तरुणही तेथे अडकल्याचे त्याने म्हटले आहे. काही जणांची हत्या झाल्याचीही धक्कादायक माहिती त्याने फोनवर दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तरुणाने मित्रालाgolden triangle  सांगितलेल्या माहितीनुसार, सुमारे 500 ते 600 तरुण या ठिकाणी अडकल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने सांगितले की, तो घरी असताना व्हॉट्सअॅपवर त्याला एक मेसेज आला, ज्यामध्ये अॅनिमेशन डिझायनर आणि सोशल मीडिया हाताळणीचे बँकॉकमधील काम असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर तो बँकॉकला गेला.
तेथे पोहोचल्यानंतर त्याला गाडीत बसवण्यात आले आणि त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडून कागदपत्रे काढून घेण्यात आली, असे त्याने सांगितले. पुढे जंगलमार्गे त्याला बेकायदेशीररीत्या म्यानमारमध्ये नेण्यात आले, जिथे ऑनलाइन फसवणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात आहे. काम न केल्यास मारहाण केली जाते, जेवण दिले जात नाही, तसेच बिहारमधील एका तरुणाची हत्या झाल्याचेही त्याने सांगितले. महाराष्ट्रातील सुमारे 20 ते 30 तरुण तेथे असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. आम्हाला केवळ दहा मिनिटे मोबाइल वापरायला दिला जातो आणि आम्हाला बेकायदेशीररीत्या म्यानमारमध्ये आणण्यात आले, असेही त्याने स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
 
 
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पीडित तरुणाच्या मित्राने सांगितले की, तो राजकारणात सक्रिय असल्याने त्याच्या मित्राने मदतीसाठी त्याला व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला. त्यानंतर व्हॉइस कॉलद्वारे संपूर्ण परिस्थितीची माहिती देत मदतीची विनंती करण्यात आली. नोकरीच्या आमिषाने फसवणूक करून त्याला म्यानमार-थायलंड सीमाभागात नेण्यात आले असून, तेथे बंदुकीच्या धाकावर ऑनलाइन फसवणुकीची कामे करून घेतली जात असल्याचे त्याने सांगितले. काम न केल्याने तीन तरुणांची हत्या झाल्याची माहितीही त्याने दिली. त्यानंतर कुटुंबीयांना धीर देत त्यांनी पोलिसांत धाव घेतली असून, सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व तरुणांना सुरक्षित परत आणण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.