गडचिरोली,
gratitude-and-felicitation-ceremony : गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अजय बळवंत देशमुख यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त तसेच 30 जून रोजी होणार्या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या औचित्याने आयोजित कृतज्ञता गौरव सोहळा नुकताच गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सभागृहात पार पडला. या सोहळ्यात संघटनात्मक तसेच कार्यालयीन कार्यात उल्लेखनीय योगदान देणार्या दोन कर्तव्यनिष्ठ कर्मचार्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी गोंडवाना विद्यापीठातील सांख्यिकी सहायक दिनेश टेकाम यांना कर्मचारी संघटनेची निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निःपक्षपाती व यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल तसेच विद्यापीठ कर्मचार्यांच्या एकस्तर पदोन्नतीच्या थकित आर्थिक लाभासाठी दिलेल्या उल्लेखनीय सहकार्याबद्दल उत्कृष्ट सहकारी गौरव प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तसेच विद्यापीठातील निम्न श्रेणी लिपिक योगेश सोपणकर यांना कर्मचारी संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अत्यंत समर्पित, जबाबदारीने व पारदर्शक कार्यपद्धतीने बजावलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सहकार्य गौरव प्रदान करून गौरविण्यात आले.
या दोघांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीचा, कर्तव्यनिष्ठेचा, संघटनात्मक बांधिलकीचा आणि सेवाभावी वृत्तीचा सखोल विचार करून गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी या दोन्ही कर्मचार्यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करत संघटनेने केलेला हा सन्मान अत्यंत योग्य, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले.