हाय-प्रोफाइल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश!

सिनेसृष्टीतील प्रमुख अभिनेत्रीची सुटका

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
गिरगाव,
sex-racket-busted : मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरात सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाइल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका हॉटेलमध्ये नियोजनबद्ध रीतीने छापा टाकून या अवैध व्यवसायातून तीन अभिनेत्रींची सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका आहे, तर दुसरी अभिनेत्री बंगाली सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिसऱ्या अभिनेत्रीने अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या आणि कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. गिरगावातील या हॉटेलमध्ये अभिनेत्रींच्या माध्यमातून हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, ज्याच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.
 
 

GIRGAON
 
 
 
या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाने या रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू केला आहे. यात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाल्याचा संशय असून, संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची या प्रकरणातील भूमिका काय होती, याचीही चौकशी केली जात आहे. या काळ्या धंद्यामागे मनोरंजन क्षेत्रातील किंवा बाहेरील इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाल आणि इतर संबंधित व्यक्तींची कसून चौकशी करत आहेत.
 
 
 
 
देहव्यापाराविरुद्धची ही पहिलीच कारवाई नाही, कारण यापूर्वी जानेवारी महिन्यात नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरातही 'अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाने' अशीच एक मोठी कारवाई केली होती. तिथे एका लॉजमध्ये सुरू असलेल्या अड्ड्याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी आधी एक बनावट ग्राहक पाठवला होता आणि खात्री पटताच छापा टाकून सात महिलांची सुटका केली होती, तसेच तीन आरोपींना अटक केली होती. गिरगावमधील या ताज्या छाप्यानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले असून, या हाय-प्रोफाइल रॅकेटच्या तपासातून आगामी काळात आणखी काही धक्कादायक माहिती आणि मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.