हिंगणघाटात निसर्गसाथीतर्फे विहीर भेट यात्रा

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट,
hinganghat ब्रिटिश काळात पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक विहीरी काळ्या दगडांनी बांधण्यात आल्या. आज शहरातील सर्व सार्वजनिक विहिरीची अवस्था अत्यन्त खराब झाली आहे. या विहिरी कचरा कुंडी झाल्या आहेत. प्लास्टिक, रबर, थर्माकोल या विहिरीत कचर्याचा स्वरूपात पडून आहे. या कचर्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. विहिरीची दुरावस्था निदर्शनात आणून देण्यासाठी निसर्गसाथीतर्फे विहीर भेट यात्रेचे आयोजन करण्यात आले.
 

hinganghat, nisargasathi, water conservation, 
 
 
प्लास्टिक, रबर, थर्माकोल या मुळे रासायनिक घटक पाण्यात मिसळतात व पाण्याचा गुणवत्तेवर वाईट परिणाम करतात. विहिरीतील कचर्यामुळे डास, दुर्गंधी आणि प्रदूषणाचा इतर समस्या सुद्धा निर्माण होते तसेच विहिरीचे मूल्य सुद्धा कमी होत आहे.
कचरा साठल्यामुळे गाळ वाढतो. त्यामुळे पाण्याचा साठा कमी होतो. विहिरीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते तसेच पावसाचे पाणी शोषण करण्याची क्षमता पण कमी होते.मागील पाच वर्षा पासून भरपूर पाऊस पडत असल्यामुळे वणा नदीला भरपूर पाणी आहे म्हणून आम्ही निश्चित आहे. भविष्यात मात्र पाणी पडेलच असे नाही. सरकारतर्फे नदीचे पाणी एखाद्या कंपनीला विकल्या गेले तर हिंगणघाट शहरात पाण्याची कमतरता निर्माण होईल अशा वेळीच या विहिरीच पाण्यासाठी महत्त्वाचा स्त्रोत राहणार आहे.
नगर पालिकेला या विहिरीचा hinganghat  विसर पडला म्हणून निसर्गसाथी ऐतिहासिक ग्रुप तर्फे विहीर भेट यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेत न्यायालयासमोरील विहीर अर्धी बुजलेली अवस्थेत दिसून आली. या यात्रेत पाणी पुरवठा सभापती रवीला आखाडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक सोरटे, वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजुरकर, किशोर उकेकर, प्रशांत भोयर, यशवंत शिवणकर, शिवम भातलोंढे, प्रशांत सुरसे, मंगेश हस्ते आदींनी विहिरींना भेटी देऊन विहीरीची पाहणी केली.नगर पालिकेच्या वतीने तात्काळ हिंगणघाट विहीर समितीची स्थापना करून या विहिरीची स्वछता करून वॉटर रिचार्जसाठी वापर करावा अशी मागणी निसर्गसाथीतर्फे करण्यात आली.