मुंबई,
Ketan Agarwal case also on fast track पुण्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाने ६५ वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना न्यायालय आणि तपास यंत्रणेचे कौतुक केले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी केतन अग्रवाल प्रकरणाबाबतही मोठी घोषणा केली. “नियोजित कट किंवा अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या केसेस फास्टट्रॅकवर घेऊन त्यांचा जलद निकाल लावला जाईल,” अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मीळ” स्वरूपाचा असल्याचे नमूद केले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाने आरोपीसाठी फाशीची शिक्षा मागितली होती आणि अखेर न्यायालयाने ती मान्य करत निकाल जाहीर केला.या संपूर्ण प्रकरणात तब्बल ५८ दिवसांत तपास, आरोपपत्र आणि सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागला, ज्यामुळे हा खटला जलद सुनावणीच्या उदाहरणांपैकी एक ठरला आहे. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानवी आणि समाजमनाला हादरवणारा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास पूर्ण करत दोन आठवड्यांच्या आत आरोपपत्र दाखल केले आणि सर्व महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयानेही हा खटला “रेअरस्ट ऑफ द रेअर” प्रकारात मोडतो असे निरीक्षण नोंदवले असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी सांगितले की या निकालामुळे समाजात गुन्हेगारांवर वचक बसेल आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका आवश्यक आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्र्यांचेही कौतुक केले, तसेच तपास अधिकाऱ्यांचे आणि सरकारी वकिलांचेही अभिनंदन केले.