सेवाग्राम रेल्वे भुयारी मार्गावर गुडघाभर पाणी

अन्त्ययात्रेचाही मार्ग बदलला

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
वर्धा,
sevagram-railway-underpass : वर्धेचा विकास आता स्मशानभूमीपर्यंत पोहोचला आहे. सेवाग्राम रेल्वेस्थानकाकडून बल्लारशहाकडे जाणार्या रेल्वे लाईनचे काम सुरू असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर अडथळे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावर आता पावसाळ्याच्या दिवसात गुडघाभर पाणी वाहू लागले आसे. परिणामी, स्मशानभूमीत प्रेत अन्त्यसंस्काराकरिता नेण्याच्या मार्गातही बदल करावा लागला आहे.
 
 
j lk
 
 
सेवाग्राम रेल्वे स्टेशनजवळील, वर्धा शहरातील स्मशानभूमीकडे जाणारा रेल्वे भुयारी मार्ग अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो आहे. हा मार्ग स्मशानभूमीकडे जाण्याचा मुख्य आणि जवळपास एकमेव मार्ग आहे. पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे अन्त्ययात्रा नेताना अडचणींचा सामना करावा लागतो. वारंवार तक्रारी करूनही, या समस्येवर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. या मार्गावर रात्रीच्या वेळी समाजकंटकांच्या कारवाया आणि सुरक्षेच्या चिंतेच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. प्रशासनाने या समस्येवर मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.