सीबीएसईचा मोठा निर्णय...तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा नाही

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Major decision by CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेथ्री-लँग्वेज पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांमधील आणि पालकांमधील संभ्रम दूर केला आहे. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, सध्या ७वी, ८वी, ९वी आणि विद्यमान १०वीतील विद्यार्थ्यांसाठी कोणताही अचानक मोठा बदल लागू केला जाणार नाही. विशेष म्हणजे, तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा देण्याची सक्ती या विद्यार्थ्यांवर असणार नाही. सीबीएसईने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सध्या १०वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर नवीन भाषा धोरण लागू होणार नाही. त्यामुळे यंदा बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषय किंवा बदलांची चिंता करण्याची गरज नाही. ते पूर्वीप्रमाणेच दोन भाषा शिकत राहतील आणि त्यांनाच परीक्षा द्यावी लागेल.
 
 
dsf546657
 
७वी, ८वी आणि ९वीतील विद्यार्थ्यांसाठी मात्र तीन भाषा शिकण्याचा नियम टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. या तीन भाषांपैकी किमान दोन भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी आधीपासून हिंदी आणि तमिळ शिकत असेल, तर तिसऱ्या भाषेसाठी इंग्रजी, फ्रेंच किंवा अन्य भाषा निवडू शकतो. मात्र जर एखादा विद्यार्थी इंग्रजी आणि फ्रेंचसारख्या दोन विदेशी भाषा शिकत असेल, तर त्याला यासोबत किमान एक भारतीय भाषा शिकणे बंधनकारक असेल.बोर्डाने काही विद्यार्थ्यांना विशेष सवलतीही दिल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना कायद्यानुसार सूट दिली जाईल. भारताबाहेरील सीबीएसई शाळांतील विद्यार्थ्यांसाठी भारतीय भाषा शिकणे अनिवार्य राहणार नाही. तसेच परदेशातून भारतात परतलेल्या विदेशी विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भारतीय भाषेतून सूट देण्यात आली आहे.२०२६-२७ शैक्षणिक सत्रातील ६वीच्या विद्यार्थ्यांपासून ही नवी भाषा धोरण पूर्णपणे लागू होणार आहे. या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक असेल आणि त्यापैकी दोन भारतीय भाषा असतील. हेच विद्यार्थी १०वीत पोहोचल्यानंतर तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षाही देणार आहेत.