वाशीम
manora police मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले असून, एका मोटार सायकलसह चोरट्याला अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की, जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून निकेश खाटमोडे यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण झाला आहे. अनेक दाखल गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मानोरा पोस्टे ला दाखल मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नैना पोहेकार यांचे आदेशाने तयार करण्यात आलेल्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असतांना आरोपी नितीन डिगांबर ठवकर वय ३३ रा. manora police भुलाई ता. दारव्हा जि. यवतमाळ याने मोटार सायकल चोरी गेल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी गेलेली हिरो कंपनीची पॅशन प्रो एमएम ३७ एम ३८७३ क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर यांचे मार्गदर्शनात प्रभारी पोलिस निरीक्षक नैना पोहेकर व त्यांचे पथकातील पोउपनी सागर भारस्कर, पोहवा राधेश्याम महल्ले, गणेश राठोड, पोकाँ पंकज खाडे, रोहन तायडे, चेतन भोयर यांनी केली आहे.