अवघ्या काही तासांत यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये अव्वल

‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर ठरला सुपरहिट

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
मुंबई
mirzapur the movie teaser ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा बहुप्रतीक्षित टीझर अखेर प्रदर्शित झाला असून, रिलीज होताच त्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या काही तासांतच हा टीझर यूट्यूबच्या ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
 

mirzapur the movie teaser 
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ‘मिर्झापूर’ची ओळख बनलेली सत्ता, सूड, रक्तरंजित संघर्ष आणि दमदार संवादांची झलक पाहायला मिळते. पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा हे पुन्हा एकदा त्यांच्या लोकप्रिय भूमिकांमध्ये दिसत असून, त्यांच्या प्रभावी स्क्रीन प्रेझेन्समुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. याशिवाय, मोठ्या पडद्यावर ‘मिर्झापूर’चे विश्व अधिक भव्य, सिनेमॅटिक आणि रोमांचक स्वरूपात साकारण्यात आल्याचेही टीझरमधून स्पष्ट होते.
 
 
टीझरला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर निर्मात्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ‘Mirzapur: The Movie’चा टीझर यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याची माहिती दिली. तसेच, येत्या ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये भेटण्याचे आवाहनही त्यांनी प्रेक्षकांना केले.
या चित्रपटाच्या भव्य mirzapur the movie teaser स्टारकास्टमध्ये अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौड, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस. चौहान यांचाही समावेश आहे. या सर्व कलाकारांच्या उपस्थितीमुळे ‘मिर्झापूर’च्या विश्वातील एक नवा, अधिक भव्य आणि थरारक अध्याय प्रेक्षकांसमोर उलगडणार असल्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
‘मिर्झापूर: द मूव्ही’ची निर्मिती Amazon MGM Studios आणि Excel Entertainment यांच्या प्रस्तुतीखाली होत आहे. गुरमीत सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली आणि पुनीत कृष्णा यांच्या लेखणीतून साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली केली आहे. कासिम जगमागिया आणि विशाल रामचंद्रनी हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये भव्य स्वरूपात प्रदर्शित होणार आहे.