मोहाडी
mohadi lightning strike news तालुक्यातील बेटाळा येथे शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज 29 रोजी घडली. रामकृष्ण देशमुख असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
देशमुख हे शेतात काम करीत असताना अचानक वातावरण बदलले. ढगांचा गडगडाट आणि विजा चमकू लागल्या. दुपारी अडीच वाजता च्या दरम्यान रामकृष्ण देशमुख हे काम करीत असलेल्या ठिकाणी वीज कोसळली. यात 52 वर्षीय देशमुख यांचा मृत्यू झाला. मोहाडी, तुमसर तालुक्यात वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. घटने नंतर पोलिस आणि महसूल विभागाने पुढील कारवाई केली.