सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत तरुणी ठार

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
nagpur-accident : एका सिमेंट वाहून नेणाऱ्या मिक्सर ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण आणि तरुणी गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जखमी तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजता पारडी हद्यीतील भंडारा रोडवरील सुरुची कंपनी समोर घडला. इंद्रायणी वैरागडे (वय २५) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर विवेक गुलाबचंद गुप्ता (वय २७) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
 
 
Indrayani-Vairagade
 
 
जुनी मंगळवारी परीसरात राहणारी इंद्रायणी वैरागडे ही आपला मित्र विवेक गुप्ता याच्यासोबत रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास दुचाकीने जात होते. पारडी हद्यीतील भंडारा रोडवरील सुरुची कंपनी समोरुन जात असताना मागून येणाऱ्या मिक्सर ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्याना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंद्रायणी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर विवेकवर उपचार सुरु आहे. या प्रकरणी पारडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.