नागपूर,
Nagpur News नागपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक काळे यांच्या 'अपहरण' या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद आता प्रकाशित होत आहे. या कादंबरीचा अनुवाद एस.बी.सी.टी. महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. प्रा. प्रांजली काणे यांनी केला आहे. ही कादंबरी आतापर्यंत एकूण आठ पुरस्कारांनी सन्मानित झाली आहे.
त्यामध्ये बाबुराव बागुल, शांताबाई शेळके, मुकुंदराव पाटील आणि वामनराव गद्दामवार अक्षरवेध हे महत्त्वाचे कादंबरी पुरस्कार समाविष्ट आहेत. डॉ. अशोक काळे यांनी तीन काव्यसंग्रह, एक ललित लेखसंग्रह तसेच “रेखाटन रंग रेषा” हे पुस्तक प्रकाशित केले आहे. साहित्याबरोबरच त्यांनी संगीत आणि शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे.
सौजन्य: संजीव भुसारी, संपर्क मित्र