पुणे
devendra fadnavis पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे नमूद करत, अशा अमानुष गुन्हेगारांना समाजात स्थान नसल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणात गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत तपास, पुरावे सादर करण्याची प्रक्रिया आणि न्यायालयीन सुनावणी पूर्ण होत निकाल लागला. त्यामुळे राज्यातील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणांमध्ये सर्वात वेगाने निकाल लागलेल्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित बालिकेला न्याय मिळवून दिल्याबद्दल न्यायालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला असून अशा नराधमांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संवेदनशील स्वरूपाच्या devendra fadnavis या खटल्यात प्रभावी तपास आणि सक्षम बाजू मांडल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सरकारी वकील अजय मिसर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. या प्रकरणात तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाने केलेल्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले.दरम्यान, १ मे रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संतापाची लाट उसळली होती. विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय पक्षांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.प्रकरणातील गुन्ह्याचे गांभीर्य, पीडितेचे अल्पवय, अत्याचारानंतर करण्यात आलेली निर्घृण हत्या तसेच समाजावर झालेला परिणाम या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने हा गुन्हा 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' स्वरूपातील असल्याचे नमूद केले आणि आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.