सार्वजनिक ठिकाणी फाशीची शिक्षा द्या

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
पुणे,
narasapur girl murder पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आज सोमवारी भीमराव कांबळे याला “मरेपर्यंत फाशी”ची शिक्षा सुनावली. या निकालामुळे महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात असून पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
 

narasapur girl murder case verdict 
ही घटना १ मे रोजी घडली होती. आरोपी भीमराव कांबळे याने अत्यंत क्रूरपणे हे कृत्य केल्याचा आरोप असून तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले होते. अवघ्या ५५ दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय व सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निकालाचे स्वागत करत पोलिस दल व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच न्यायालयाचे आभार मानले. पुणे ग्रामीण पोलिसांनी जलद व प्रभावी तपास केल्याचे त्यांनी नमूद केले.सुळे यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासूनच राजकारण टाळण्याची भूमिका घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊनही त्यांना या प्रकरणाच्या गांभीर्याची कल्पना देण्यात आली होती आणि सरकारकडून सहकार्याचे आश्वासन मिळाले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पीडित मुलीला न्याय narasapur girl murder  मिळण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. “ज्या दिवशी आरोपीला शिक्षा अंमलात येईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने पीडितेला न्याय मिळेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.याचवेळी सुप्रिया सुळे यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया देताना आरोपीला सार्वजनिक ठिकाणी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. “त्याला भर चौकात फाशी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच आपल्या भावनात्मक संतापातून “त्याला कठोर शिक्षा व्हावी,” असेही त्या म्हणाल्या.या प्रकरणातील न्यायालयीन निकालानंतर प्रशासन, पोलिस आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेचे विविध स्तरांवरून कौतुक होत आहे.