निर्मल नगरीत भक्तिभावात पारायण सोहळा

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Nirmal Nagari, Umred Road उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टतर्फे आयोजित ३६ वे सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथ पारायण रविवारी संपन्न झाले. या धार्मिक सोहळ्यास नागपूर शहर व परिसरातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
 
34
 
सकाळी श्रींच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथ पारायण, प्रकट वाचन, महाआरती व नामस्मरणाचा कार्यक्रम पार पडला. मंदिर परिसर "गण गण गणात बोते"च्या जयघोषाने दुमदुमून गेला. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होतेNirmal Nagari, Umred Road.यावेळी आयुक्त कार्यालयात कार्यरत पोलीस निरीक्षक कोळी यांचा सुनील बालपांडे यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी ट्रस्टच्या धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक करून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सौजन्य देवराव प्रधान,संपर्क मित्र