पुणे
pune shramik patrakar sangh, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या २०२६-२७निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी उमेश शेळके विजयी झाले, तर सरचिटणीसपदी हिरा सरवदे यांची बिनविरोध च्या वार्षिक आहे.निवड झाली उमेश शेळकेकार्यकारिणी सदस्य म्हणून 'तरुण भारत'चे मुख्य उपसंपादक दीपक होमकर यांची निवड झाली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुकीत दैनिक तरुण भारतचे मुख्य उपसंपादक दीपक होमकर कार्यकारिणी सदस्यपदी विजयी झाले. या विजयाबद्दल प्रबंध संचालक धनंजय वापट यांनी होमकर यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी निवासी संपादक सचिन कापसे, सहयोगी संपादक विजय लाड यांच्यासह संपादकीय विभागातील सहकारी उपस्थित होते.
हिरा सरवदे पुणे श्रमिक पत्रकार संघाची निवडणूक रविवारी (२८ जून) पार पडली. निवडणुकीनंतर मतमोजणीत 'सकाळ' चे शेळके यांनी अध्यक्षपदी बाजी मारली, तर सरचिटणीसपदी 'लोकमत'चे हिरा सरवदे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीत इतर पदांवर उपाध्यक्षपदी 'टिव्ही ९'चे योगेश बोरसे आणि 'पुढारी'चे किशोर बरकाले यांची, तर खजिनदारपदी 'मटा'चे प्रसाद पानसे यांची निवड झाली. याशिवाय चिटणीसपदी 'दै.भास्कर'चे राहुल देशमुख आणि 'लोकसत्ता'चे संजय सपकाळे यांची निवड झाली. तसेच कार्यकारिणी सदस्यपदी दीपक होमकर (तरुण भारत), सुशांत राऊत (टीव्ही ९), ज्ञानेश्वर फड (प्रभात), उद्धव धुमाळे (लोकमत), अक्षय फाटक (नवभारत), तुषार झरेकर (पुढारी न्यूज), गोपाळ गुरव (मटा), मिलिंद शुक्ल (प्रभात), मनोज मोरे (लोकसत्ता), सचिदानंद वाघमारे (सरकारनामा) यांची निवड झाली. या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.