राज्य माता गोमाता संवाद यात्रा

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
वाशीम
rajamata gomata samvad yatra देशी गोवंशाचे संरक्षण, संवर्धन आणि गौशाळांना आत्मनिर्भ बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंर्वधन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा गुरुवार १ जुलै रोजी वाशीममध्ये येणार असून, जैन भवन अकोला नाका वाशीम येथे सायंकाळी ४ वाजता यात्रेचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 

rajamata gomata samvad yatra 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प. पु. समर्थ सद्गुरु गजानंद माऊली हे राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आ. श्याम खोडे, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अध्यक्ष महाराष्ट्र गोसेवा आयोग शेखरजी मुंदडा, प्रमुख उपस्थिती आ. बाबुसिंग महाराज, शांतीपुरी महाराज, गोपाल महाराज, विशेष उपस्थिती आ. भावना गवळी, आ. सई डहाके, नगराध्यक्ष अनिल केंदळे, माजी आ. विजय जाधव, डॉ. तुषार बावने, देविदास पाटील राऊत, रास्वसं संघाचे वाशीम जिल्हा कार्यवाह पुरुषोत्तम ढोबळे, विहिंप चे रामभाऊ देशपांडे, मातृशक्ती दुर्गा वाहिनी च्या अनिता काकडे, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, भिमकुमार जिवनानी, प्रविण पटेल, डॉ. हरिष बाहेती आदींची उपस्थिती लाभणार आहे.
महायुती सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा बनवून गोमातेच्या रक्षणासाठी ठोस पावले उचचली आहेत. गोसंवर्धन, गोसेवा आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्व जनमानसात रुजविण्यासाठी राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथून २२ जून रोजी यात्रेला प्रारंभ झाला असून, ५ जुलै रोजी नागपूर येथे समारोप होणार आहे. या संवाद यात्रेला गोप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग वाशीम, सर्व गोशाळा संचालक, राष्ट्रीय सनातन सेना वाशीम यांनी केले आहे.
................