समुद्रपूर,
samudrapur तालुक्यातील गोविंदपूर (आजदा) परिसरात २८ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, झाडावर वीज कोसळल्याने आश्रयास असलेल्या १० वानरांचा जागीच मृत्यू झाला.
गोविंदपूर (आजदा) परिसरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान झाडावर माकडांनी आश्रय घेतला. मात्र, याच झाडावर वीज कोसळल्याने १० माकडांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रमेश भालकर, प्रवीण पेंडे तसेच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माकडांवर अन्त्यसंस्कार मूठमाती देत माणुसकीचा परिचय दिला.