वटपौर्णिमेनिमित्त महिला सन्मान दिन

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नागपूर ,
Shankarnagar, Nagpur शंकरनगर नागरिक व सांस्कृतिक मंडळातर्फे वटपौर्णिमेनिमित्त महिला सन्मान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान मंदिर परिसरात वडाच्या झाडाच्या पूजेसाठी आलेल्या महिलांचा गुलाबपुष्प, शुभेच्छापत्र आणि लाडूचा प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
 

bj 
 
यावेळी वडाच्या झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला होता. प्रियंका जयंत गडकरी यांनी फुलांची आकर्षक रांगोळी साकारून कार्यक्रमाची शोभा वाढविली.विशेष म्हणजे हा उपक्रम पुरुष मंडळींच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.Shankarnagar, Nagpur शंकरनगरमध्ये प्रथमच अशा स्वरूपाचा महिला सन्मान दिन साजरा करण्यात आल्याने महिलांनी आयोजकांप्रती आनंद व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: महेश मोळकर,संपर्क मित्र