वटपौर्णिमेनिमित्त महिलांची वटवृक्षाला वंदना

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Vat Purnima 2026 सद्भावना नगर बगीच्यात वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वटवृक्षाचे विधिवत पूजन करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यानिमित्त बगीच्यातील वडाच्या झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला.
 

vat 
 
 
पहाटे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या. त्यांनी वटवृक्षाची पूजा करून एकमेकींना हळदी-कुंकू लावत शुभेच्छा दिल्या.Vat Purnima 2026 या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना तितरे यांनी वटपौर्णिमेचा संदेश केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून निष्ठा, प्रेम, समर्पण आणि कुटुंबातील भावनिक बंध दृढ करण्याचा असल्याचे सांगितले.आजच्या काळात स्त्री-पुरुष दोघेही संसार आणि करिअरची जबाबदारी समानतेने पार पाडत आहेत. त्यामुळे पतीच्या दीर्घायुष्याबरोबरच स्वतःच्या आरोग्याची आणि दोघांच्या सर्वांगीण स्वास्थ्याचीही प्रार्थना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी माधुरी मेहर, वैष्णवी मेहर, सीमा बुटले, संगीता मोहरले यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
सौजन्य :रमेश मेहर ,संपर्क मित्र