मानोरा,
vat savitri ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा होणारा वटसावित्रीचा सण आज, २९ जून रोजी तालुयात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी सुवासिनी महिलांनी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केली.
पहाटेपासूनच शहर व तालुयातील विविध गावातील वडाच्या झाडाखाली महिलांची गर्दी जमली होती. नटून-थटून आलेल्या महिलांनी वडाच्या झाडाला सूताचे धागे गुंडाळून सात प्रदक्षिणा घातल्या. वडाच्या मुळाशी हळद-कुंकू वाहून, फुले, फळे अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली. पतीव्रता सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत आणले, ती कथा आजच्या दिवशी सांगितली जाते. सावित्रीने वडाच्या झाडाखालीच तप करून सत्यवानाचे प्राण परत मिळवले, म्हणून वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वडाचे झाड दीर्घायुषी vat savitri असल्याने पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.महिलांनी आंबे, फणस, जांभळे या पाच फळांसह १६ प्रकारची पत्री, गहू, हरभरे वडाला अर्पण केले. पूजा झाल्यावर वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी घालून वडाच्या सालीचा तुकडा व आशीर्वाद म्हणून तीर्थ घेतले. जाणत्या महिलांनी नववधूंना वटसावित्री व्रताचे महत्त्व व पूजा विधी समजावून सांगितला. संध्याकाळी सुवासिनींनी एकत्र येऊन सावित्री-सत्यवानाची कथा ऐकली व उपवास सोडला. शहरासह तालुयातील बहुतांश गावात दिवसभर भक्तिमय वातावरण होते.