वर्धा बसस्थानकावर नाथजल ‘अनाथ’; चढ्या भावात विक्री

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
वर्धा,
nathjal water overcharging वर्धा बस स्थानकावर नाथजल पेयाची ठरवून दिलेल्या भावापेक्षा जास्त भावात विक्री होत आहे. याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
 

nathjal water overcharging  
मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब हिरे रा. हे डोंबिवली वरून वर्धा येथे आले होते. त्यानंतर २६ जुलै रोजी दुपारी २.४५ वाजता सिंधी रेल्वे येथे निघाले. त्यांनी बसस्थानक परिसरातील नाथजलच्या स्टॉलवरून त्यांनी नाथजल बॉटल विकत घेतली. नाथजल विक्रेता यांनी प्रवासी हिरे यांच्याकडून २० रुपये एवढे शुल्क घेतले. यासंदर्भात बस स्थानकावर काही प्रवासी सोबत चर्चा केली असता त्यांनी सुद्धा हीच नाथजलची बॉटल २० रुपयाला घेतली असे सांगितले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांना स्वस्त व दर्जेदार पिण्याची पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नाथजलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, कंत्राटदरामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नाथजल विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी भाऊसाहेब हिरे यांनी केली आहे. या संदर्भात विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे व उपमहावस्थापक नियंत्रण समिती मुंबई यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.