मुंबई
welcome to the jungle बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'वेलकम टू द जंगल’ सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र पण बहुतांश सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाशी संबंधित एक सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
चित्रपटाचे निर्माते फिरोज ए. नाडियाडवाला यांनी स्पष्ट केले आहे की वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या कमाईतील एक ठरावीक हिस्सा भारतीय सशस्त्र दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी, विशेषतः त्यांच्या विधवांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “मी निर्णय घेतला आहे की ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या कमाईतील काही हिस्सा आपल्या शूर सशस्त्र दलातील शहीद जवानांच्या विधवांच्या कल्याणासाठी देण्यात येईल. ही रक्कम अशा संस्थांना दिली जाईल, ज्या या कार्यात सक्रियपणे काम करत आहेत.”
निर्मात्यांच्या याwelcome to the jungle घोषणेमुळे चित्रपटाला केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक जबाबदारीचीही जोड मिळाली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाची कथा देखील काही प्रमाणात लष्करी पार्श्वभूमीवर आधारित आहे. कथानकाच्या सुरुवातीला काही पात्रे आर्मी ऑफिसर्सच्या वेशात चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दिसतात. पुढे या घटनांमुळे निर्माण झालेल्या गोंधळातून कथा पुढे सरकते आणि अखेरीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष लष्कराचा हस्तक्षेप दाखवण्यात आला आहे.दरम्यान, चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि त्याची बॉक्स ऑफिसवरील सुरुवात लक्षवेधी ठरत असून, स्टारकास्ट आणि कॉमेडी घटकांमुळे चित्रपट चर्चेत आहे.