सावरगांव फॉरेस्ट अरुंद रस्त्यावर अपघात
दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅटर ट्रॉली पलटी
दिनांक :03-Jun-2026
Total Views |
मानोरा,
accident : तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट या गावाला जोडणारा रस्ता अतिशय अरुंद असल्याने या गावाला येणे जाणे करणार्या वाहनधारकाला आपले जीव मुठीत घेऊन ये जा करावे लागते.
आज, ३ जून रोजी दुपारी विटांनी भरलेले ट्रॅटर सावरगांव फॉरेस्ट कडे जात असताना विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकी स्वाराला रस्ता देण्याच्या प्रयत्न करणार्या ट्रॅटरची विटांनी भरलेली ट्रॉली पलटी झाली. अपघातातील दुचाकी स्वार मोटरसायकल सह खाली खड्ड्यात पडल्याने त्याचे एक पाय तुटल्याचे पुढे आले आहे. सावरगाव फॉरेस्ट रस्ता बांधकाम करताना या रस्त्याच्या दोन्ही साईडच्या पट्ट्या भरलेल्या नसल्याने दोन वाहने एकाच वेळी आल्यास या रस्त्यावरून दोन वाहने निघणे कठीण होऊन जाते ज्यामुळे सातत्याने या रस्त्यावर अपघात होत असतात. या रस्त्याचे नियंत्रण असलेल्या सरकारी आस्थापनेने तातडीने पावले उचलून योग्य ती कारवाई करण्याची मागणी अरुण राठोड यांच्या वतीने करण्यात आली आहे.